
मुख्तार मणियार/औसा, प्रतिनिधी:
केंद्र सरकारने आंतरराज्य व राज्यांतर्गत खासगी वाहनाने प्रवास करण्यासाठीचे निर्बंध उठविले आहेत,पण राज्य सरकारने खाजगी मालवाहतूक व प्रवासासाठी खासगी वाहनांना ई- पास बंधनकारक केला आहे. ही अट नागरिकांसाठी जाचक आहे. तेव्हा राज्य सरकारने तात्काळ ही अट रद्द करावी,अशी मागणी आ.अभिमन्यु पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्य सरकारने राज्यांतर्गत एस.टी.प्रवासाला परवानगी दिली आहे.त्यांना ई- पासची गरज नाही.पण नागरिक, व्यापारी यांना उद्योग- व्यापार व अन्य कामानिमित्त राज्यातील अथवा राज्यांतर्गत व खासगी वाहनांचे प्रवास,मालवाहतूक करावी लागते. त्यासाठी ई- पास काढणे कठीण होत आहे.राज्य सरकारने तात्काळ ई- पास अट रद्द करावी,अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यु पवार यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन