असंतोषाचे वलय जिल्हाभर पोहचण्याची शक्यता!

संजय हुलगे
माळशिरस, प्रतिनिधी :
माळशिरस तालुक्यात बहुसंख्येने असलेल्या धनगर समाजाचा तालुकाध्यक्ष होण्याची दाट शक्यता असताना विशिष्ट घडामोडीनंतर समाजाला डावलण्यात आले. धनगर समाजाच्या क्रांतीचे उगमस्थान मानले जात असलेल्या माळशिरस तालुक्यात या निवडीनंतर भारतीय जनता पार्टीबद्दल धनगर समाजाच्या मनामध्ये असंतोषाची लाट पसरली आहे.सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये समाजाच्या एकाही व्यक्तीला स्थान दिले नाही. यामुळे या लाटेचे वलय जिल्हाभर वाढत जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडीवरून नाराज झालेले तालुक्यातील नेते बाळासाहेब सरगर यांच्या निवासस्थानी भेट देऊन योग्य सन्मानाचे पद मिळवून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.’शिवरत्न’ येथे झालेल्या तालुकाध्यक्ष निवडीमध्ये धर्मपुरीचे सरपंच बाजीराव काटकर यांना तालुकाध्यक्षपदी पत्र दिल्याने समाजासह इच्छुक असणारे बाळासाहेब सरगर नाराज झाले.
नुकत्याच झालेल्या सोलापूर जिल्ह्यामधील भाजपा तालुका अध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये माळशिरस मंडलची निवड झाली आहे. पुर्वी राहिलेल्या निवडीपैकी बार्शी,माळशिरस,पंढरपूर मंडल वगळता जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष पदाच्या निवडी यापूर्वी पार पडल्या आहेत. या निवडी माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी पूर्ण केल्या होत्या, तर बार्शी व माळशिरस या निवडी नूतन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी पूर्ण केल्या. यामध्ये सर्व समाजाला इतरत्र स्थान दिले आहे. मात्र अकरा पैकी एकही मंडलात धनगर समाजाचे अध्यक्ष न झाल्याने समाजावर अन्याय झाल्याची भावना जिल्ह्यामध्ये आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस, पंढरपूर, करमाळा,मोहोळ, दक्षिण सोलापूर ,बार्शी या भागांमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर माळशिरस तालुका हा धनगर समाजाच्या क्रांतीचे उगमस्थान मानले जाते.त्यामुळे हा तालुकाध्यक्ष धनगर समाजाचा होईल ही आशा सर्व कार्यकर्त्यांमध्ये होती.परंतु ‘शिवरत्न’ येथे झालेल्या तालुका अध्यक्ष निवडीमध्ये धर्मपुरीचे सरपंच बाजीराव काटकर यांना तालुकाध्यक्षपदी पत्र दिल्याने समाजासह इच्छुक असणारे बाळासाहेब सरगर हे नाराज झाले.
भाजपाचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी माळशिरस याठिकाणी बाळासाहेब सरगर यांची निवासस्थानी भेट घेतली.भविष्यात पार्टीमध्ये योग्य सन्मानाचे पद मिळवून दिले जाईल अशा प्रकारचे आश्वासन दिले.यावेळी माजी तालुका अध्यक्ष सोपान नारनवर,ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष नागेश वाघमोडे, तिरवंडीचे उपसरपंच मारुती वाघमोडे,किशोर तुपसुदर,युवराज वाघमोडे,अॅड.गणेश सिद आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन