

‘फॉरेस्ट’च्या जाचक अटींमुळे आदिवासी धनगरांचे जगणे मुश्किल: संजय वाघमोडे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कोल्हापूर
सोमवार दि २०/११/२०२३ सकाळी ११ च्या दरम्यान सारिका बबन गावडे वय वर्ष आठ इ. २ रीत शिकत असणाऱ्या मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ती जागीच ठार झाली .एका वर्षातील ही येथील दुसरी घटना आहे.
सारिका ही आई गंगुबाई हिच्यासोबत गुरे चारण्यासाठी वस्ती शेजारच्या रानात गेली होती. गुरे हकताना आईच्या पाठीमागून चालत येणाऱ्या सारिकावर आधीच झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. आईच्या हे लक्षात येताच तिने आरडा ओरडा करत तिच्याकडे धाव घेतली. तेव्हा बिबट्या तिला टाकून पळाला. हल्ला एवढा जोराचा होता की ती जागीच ठार झाली. तिच्या मानेवर, चेहऱ्यावर खोलवर जखमा झाल्या आहेत. ही या गावातील दुसरी घटना असल्याने तरुण ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित राहून वन विभागाच्या दुर्लक्षितपणाचाच हा बळी गेला असे म्हणून आम्ही या मुलीचा मृतदेह चालत घेऊन शाहूवाडी तहसील कार्यालयात जाणार आहोत, असा जोरदार अट्टहास धरला. दोन तासाच्या आणि वनाधिकारी यांनी काही आश्वासने दिल्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आला.
वन्यप्राण्यांचे हल्ले व वनखात्याच्या जाचक अटीमुळे जंगलात पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या लोकांचे जगणंच मुश्किल झाले आहे. आजरा तालुक्यात हत्तीच्या हल्लात वनमजुर काही दिवसांपूर्वीच ठार झाला आहे.तर चंदगड तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. पाळीव प्राण्यांच्यावर हल्ले तर वन्यप्राण्यांचे रोजच सुरू आहेत.येथेच पुसार्ले धनगर वाड्यावरील लहान मुलीस वर्षभरापुर्वी ठार मारले आहे.खर तर वनात राहणाऱ्या वननिवासी धनगर बांधवांचे संसार संपूर्ण जंगलावर चाललेले असतात.वाळलेल्या झाडाच्या फांद्या गोळा करणे, तसेच जंगलातीलच वन जमिनीवर ते पारंपारिक शेतीही करत आलेले आहेत. जंगलातील रानमेवा पारंपारिक व्यवसाय हा शेळ्यामेंढ्या,जनावरे ही सुद्धा जंगलातील चाऱ्यावरतीच अवलंबून असतात. माणसाला जगण्यासाठी अग्नीची नित्तात गरज आहे.अग्नी पेटविण्यासाठी लाकुड,रॉकेल,गॅस यांची नितांत गरज आहे.वननिवासी जंगलात डोंगरदऱ्यात रहात असल्याने त्यांच्यापर्यंत जाण्या-येण्यासाठी आवश्यक असे रस्ते नसल्याने यांच्यापर्यत गॅस पोहचणे अवघड आहे. रॉकेल शासनाने पुर्णपणे बंद केले. आता वनाधिकारी यांनी नोटीस बजावून पारंपरिक पद्धतीने लाकूड गोळा करण्यावरही बंधने घातली. अगोदरच चराईबंदी,वनहद्द निश्चित व वन बंदी,कुराडबंदी यासारख्या कायद्याने त्यांचे जीवन उध्वस्त झाले आहे,त्यांच्यापर्यत जाण्यायेण्याचा रस्ता करण्यासाठीही वनखात्याच्या किचकट अटी असल्यामुळे रस्ते करण्यासाठी दिलेले प्रस्ताव व वनकर्मचारी यांची अरेरावी यामुळे वनकार्यालयात धूळ खात पडून आहेत.केवळ रस्ता नसल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने प्रसुतीसाठी, ,दवाखान्यात झोळीत घालून नेत असताना व सर्पदंशाने,अनेकांचे मृत्यू ही झाले आहेत.
कोल्हापूर उपवनसंरक्षकांनी वन हक्काने मिळालेल्या जमिनीवर शेती किंवा वन्यप्राण्यांने हल्ला किंवा नुकसान भरपाई देण्यात येऊ नये, म्हणून आदेश काढून वननिवासींचे जगणे आणखी मुश्किल केलेले आहे. शासनाने लक्ष घालून नुकसानग्रस्त शेतकरी किंवा सारिका गावडे यांच्या वारसांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली.
उपविभागीय अधिकारी कमलेश पाटील, मलकापुर परिक्षेत्र अधिकारी अमित भोसले,शितुरचे वनपाल दत्तात्रय जाधव,यशवंत क्रांती संघटनेचे शाहुवाडी तालुका संपर्क प्रमुख दिपक गावडेसह तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी, शित्तुर गावचे ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील,माजी सरपंच तानाजी भोसले, पोलीस पाटील दिपक भोसले यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मदत केली.
शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख एम. एम. गुरव यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या