
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
निंबवडे येथे परराज्यातील एका ४८ वर्षीय कामगाराचा अज्ञाताने खून करून मृतदेह रस्त्यालगत शेतामध्ये टाकलेला होता. मयताची ओळख पटत नसल्यामुळे आटपाडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने या खुनाचा छडा लावला असून दोन आरोपींना अटक केली आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निंबवडे गावचे पोलीस पाटील प्रवीण मांडले यांनी फोनवरून निंबवडे गावच्या हद्दीत निंबवडे-झरे मार्गावर डांबरी रस्त्याच्या पूर्वेस विक्रम देवडकर यांच्या शेतामध्ये अनोळखी पुरुषाचे प्रेत पडलेले आहे. यावरून पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व त्यांच्या स्टाफने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्याच्या डोक्यात मागील बाजूस व गुप्त भागावर मोठ्या जखमा झालेल्या होत्या. या व्यक्तीचा अज्ञातांनी खून केल्याचे पोलीस पथकाच्या लक्षात आले. प्रेताचा पंचनामा व शवविच्छेदन केल्यानंतर पोलीस पाटील प्रवीण मंडले यांनी फिर्याद देऊन आटपाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
या खूनामध्ये प्रेताची ओळख पटत नसल्यामुळे त्यासाठी आटपाडी पोलीस पथक तांत्रिकदृष्ट्या तपास करीत होते. तसेच त्यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा व कर्नाटक येथे शोध घेतला, परंतु मयताची ओळख पटली नाही. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून ही मयत व्यक्ती गादेगाव ता. पंढरपूर जि. सोलापूर येथील शिवाजी बागल यांच्या खडी क्रेशरवर काम करीत असून त्याचे नाव बजरंग मुन्नी राजभर वय ४८ वर्षे, रा.सलेमपूर, सुलतानपूर ता. किराकद, जि. जौनपूर उत्तरप्रदेश सध्या रा. गादेगाव ता. पंढरपूर जि. सोलापूर ही असे असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व पोलीस पथकाने गादेगाव येथे जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावला.
आरोपी दत्ता बाळासो गोडसे व मृत व्यक्तीचे १५ दिवसापूर्वी खडी क्रेशरवर झालेल्या वादावरून आरोपी दत्ता गोडसे व आप्पा उर्फ आप्पासो ज्ञानू गोडसे दोघेही रा. पवारवाडी, महूद ता. सांगोला जि. सोलापूर यांनी या व्यक्तीस मोटरसायकलवरून निंबवडे येथे आणले व त्याच्या डोक्यात व गुप्त भागावर दगड मारून खून केल्याचे निष्पन्न झाले.या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत.
पोलीस निरीक्षक शरद मेमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक केंद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश आवळे, उमर फकीर, राकेश पाटील, सोमनाथ पाटील, शंकर पाटील, राजेंद्र कदम, आनंद जाधव, पोलीस नाईक नितीन मोरे, सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद रोडे, महेश काळे, डॉलर कोळेकर,अमोल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पांढरे,दत्तात्रय कांबळे, कुंडलिक घेरडे यांनी ही कारवाई केली.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या