सहलीच्या एसटी बसची टेम्पोला जोरदार धडक ,एक शिक्षक जागीच ठार तर एक शिक्षक जखमी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे थांबलेल्या टेम्पोला सहलीच्या एसटी बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला तर एक शिक्षक जखमी झाला आहे. या अपघातात विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार एसटी बस क्रमांक एम एच 14 बी टी 4701 ही बस शिवाजी विद्यालय बावडा ची सहल साठी गेलेली बस कोल्हापूर येथून बावड्यासाठी परत निघाली होती.

या अपघातात शिक्षक रमाकांत शिवदास शिरसाट यांच्या डोक्याला किरकोळ जखम झाली आहे तर शिक्षक बाळकृष्ण काळे हे जागेवरच मयत झाले आहेत. जखमी व मयताला 108 अकलूज 0742 या अंबुलन्स ने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे.

108 ला कॉल आल्यानंतर वेळापूर आणि अकलूज या दोन ॲम्बुलन्स घटनास्थळी पाठवण्यात पाठवण्यात आल्या. डॉक्टर अमोल आव्हाड व पायलेट दत्तात्रय वाघमोडे तसेच अकलूज येथे डॉक्टर गौरव जाधव व ड्रायव्हर राजेंद्र वाडेकर यांनी पेशंटला जलद गतीने सेवा उपलब्ध करून दिली .