रोख रक्कम, सोने- चांदीचे दागिने अज्ञात चोराकडुन लंपास
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे ७ डिसेंबर रोजी रात्री बारा ते पहाटे तिन वाजण्याच्या सुमारास चार ठिकाणी अज्ञात चोरटयांनी चार ठिकाणी बंद दरवाजाची कुलुपे तोडुन घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेली रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागीने व इतर मौल्यवान किमती वस्तूची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
यामध्ये हनुमान तालमीजवळील राहणारे रघुनाथ देवकर यांच्या घरातील कपाटातील सोन्या – चांदीचे पंचवीस, तिस हजाराचे दागीने,राजेंद्र कस्तुरे यांच्या घरातील कॅमेरा, चांदीच्या ट्रॉफी, विलासराव माने यांच्या घरातील कपाटाची मोडतोड करीत एल ईडी टिव्ही चोरुन नेला,मुख्य पेठेतील हॉटेल चालक मनोहर माळी यांच्या कपाटातील रोख रक्कम अज्ञात चोरटयांनी चोरुन नेली आहे.
या घटनेची माहिती समजताच पिलीव पोलीस स्टेशनचे हवालदार धनाजी झगडे व दत्तात्रय खरात यांनी सर्व घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामा केला आहे.
या चोरीच्या घटनेचा अधिक तपास माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदशनाखाली हवालदार धनाजी झगडे हे करीत आहेत.
पिलीव येथे एकाच रात्री चार घरफोड्या झाल्यामुळे नागरिकामध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. याबाबत नागरिकांनी जागरुक राहवे असे आवाहन पिलीव पोलीस स्टेशनच्या वतीने करणयात आले आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
एमएएस(मास )फायनान्स बँकेच्या मनमानी व हुकूमशाही कारभारामुळे करंजा येथील प्रथमेश देसाईने केली आत्महत्या