भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी अनिलशेठ पाटील यांची निवड

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी आटपाडी येथील अनिलशेठ पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आटपाडी तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे जोमाने काम करण्यामध्ये अनिलशेठ पाटील आघाडीवर असतात. आमदार गोपीचंद पडळकर यांचे एक विश्वासू व कट्टर युवक नेते म्हणून ते परिचित आहेत. उभयतांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. वेगवेगळ्या कामांसाठी त्यांनी आंदोलने करून विकासासाठी पाठपुरावा केला आहे. त्यांच्याबरोबर युवकांची मोठी फळी कार्यरत असून त्यामुळे भाजपाला बळकटी आली आहे.
भारतीय जनता पार्टीने त्यांच्या कामाची पद्धत पाहून त्यांची युवा मोर्चाच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यामुळे युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे व कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकवर्गांला संघटित करून त्यांच्या सकारात्मक ऊर्जेला योग्य दिशा देऊन त्यांचे सबलीकरण करण्याचा मनोदय त्यांनी या निवडीनंतर व्यक्त केला आहे.