स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची माहिती
देवानंद जावीर
सांगली/ प्रतिनिधी:
तासगाव साखर कारखाना प्रश्नी भाई एन.डी.पाटील व माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली.दोघांनीही सभासद,कामगार यांच्या अस्तित्वासाठी नेटाने लढा द्या,आमचे आशीर्वाद आणि पाठबळ तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
जिल्हा अध्यक्ष महेश खराडे,संजय बेले,भागवत जाधव,प्रकाश देसाई आणि संतोष शेळके यांच्या शिष्टमंडळाने दोघांचीही भेट घेतली.भाई एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी तासगाव कारखान्याचे आंदोलन झाले होते.त्या आंदोलनामुळे विक्री प्रक्रिया लांबनीवर पडली होती,पण आता एन. डी.पाटील यांची प्रकृती बरी नसते,ते ९२ वर्षाचे आहेत.त्यामुळे आंदोलन थंडावले आहे.तासगाव कारखाना विक्री प्रक्रिया पार पडली असून तो कारखाना खा.संजयकाका पाटील यांच्या गणपती ऍग्रो प्रा.ली.या कंपनीने ३४ कोटीला विकत घेतला आहे.त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी लढ्याचे रणशिंग फुंकून २७ हजार सभासद, एक ते दीड हजार कामगार आणि कारखान्यासाठी जमिनी देणाऱ्या मागासवर्गीय शेतकऱ्यांचे काय? हा प्रश्न उपस्थित केला आहे.त्याचबरोबर कारखाना सुरू झाल्यावर धुराडीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे परिसरातील द्राक्षबागेचे मोठे नुकसान होणार,त्यामुळे राखेसाठी काय प्रयोजन केले आहे? याची उत्तरे खा.संजयकाका यांनी द्यावीत असे आवाहन केले आहे.
या लढ्याची सुरुवात भाई एन.डी.पाटील यांनी केली होती.म्हणून त्याचे मार्गदर्शन घेण्यासाठी शिष्टमंडळानेे भेट घेतली. त्यांच्या पत्नी माई सरोज पाटील यांनी आम्ही का? व कशासाठी आलो आहे?याची माहिती भाईना दिली.त्यावेळी त्यांनी माझा लढ्याला पाठींबा आणि आशीर्वाद आहे.तुम्ही नेटाने लढा द्या, कोरोना संपल्यानंतर मेळावा घ्या. त्याला मी उपस्थित राहीन अशी ग्वाही दिली. माजी खा.राजू शेट्टी यांनीही मेळाव्याला उपस्थित राहण्याची ग्वाही दिली. याप्रश्नी लवकरच येळावी येथे मेळावा घेणार आहोत, या मेळाव्यासाठी सर्व पक्ष,सर्व सामाजिक संघटना, कामगार, सभासद ,जमिनी देणारे मागासवर्गीय शेतकरी आणि परिसरातील द्राक्ष बागायतदार यांना निमंत्रित करणार असल्याचे खराडे यांनी सांगितले.


संबंधित बातम्या
आधार स्वयंसहाय्यता बचत गटाचा शतकमासपूर्ती समारंभ
मंगळवेढा साखर कारखाना येथे मोळीपूजन
मागण्या मान्य न झाल्यास धुराडे पेटू देणार नाही- जिल्हाध्यक्ष महेश खराडे