आटपाडी येथे प्रथमच दर रविवारी सहज भाषण कला प्रशिक्षण

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथे प्रशिक्षक गणेश ऐवळे व गणेश कबीर यांनी प्रथमच दर रविवारी सहज भाषण कला प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहेत.
विद्यार्थी,राजकीय व्यक्ती, अधिकारी, समाजसेवक, डॉक्टर,वकील, शिक्षक, गृहिणी व भाषण कला शिकू पाहणाऱ्या सर्वांना अत्यंत उपयुक्त ‘स्वतःला करा सिद्ध आणि व्हा प्रसिद्ध’ असा सहज भाषण कला प्रशिक्षण वर्ग दर रविवारी सुरू करण्यात आला आहे.
प्रशिक्षणामध्ये भाषण कसे करावे, देहबोली, सभाधिटपणा, राजकीय व सामाजिक भाषणे, शब्दफेक, आवाज, संस्कार, स्टेजवरची भीती दूर करण्याचे रहस्य, ऐन वेळचे भाषण, भाषणात गोष्टीचा वापर कसा करायचा, प्रेरणादायी भाषण, भाषणाची सुरुवात, मध्य आणि शेवट, सूत्रसंचालन या गोष्टी शिकविल्या जात आहेत.
प्रशिक्षण पूर्णपणे थेरी व प्रॅक्टिकलवर आधारित आहे. दर रविवारी आटपाडी-दिघंची रोड, कारखाना पाटीजवळ हॉटेल गोल्डन दरबार येथे सकाळी १०.३० ते २ .०० या दरम्यान हे वर्ग सुरू असतात. बिनधास्त बोलायचं भाषण करायला शिकायचं आणि समाजाचा नेतृत्व करायचा असेल तर आजच आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन गणेश ऐवळे सर ९९७५०९९६७७ व गणेश कबीर सर ९०९६५८१०९९ यांनी केले आहे. यासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.