लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

ग्रामीण मातीतील कलाकार शोधून त्यांच्या कलागुणांना संधी देणार : गायक नरेंद्र दिक्षीत
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
लिंगीवरे/आटपाडी:
माणदेशाच्या ग्रामीण मातीतील कलाकार शोधून त्यांच्या कलागुणांना संधी देणार असल्याचे प्रतिपादन गायक व अभिनेते नरेंद्र दिक्षीत यांनी लिंगीवरे येथे केले.
लिंगीवरे येथील धुळदेव शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री. धुळाजीराव झिंबल विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते मार्गदर्शन करताना बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष जनार्धन झिंबल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आटपाडी पंचायत समितीच्या समग्र शिक्षा अभियानाचे लेखाधिकारी प्रशांत चंदनशिवे, ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सुमन झिंबल, उपसरपंच धनाजी निंबाळकर यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
मुख्याध्यापिका सौ.जयश्री झिंबल यांनी स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.एल.जी.खटके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी स्वागतगीत गायले. आर.एल.खटके यांनी बक्षीस वितरण केले.एस.बी.पुजारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.एस.बी.सूर्यवंशी यांनी आभार मानले. एच.एम.वळकुंडे,डी.पी.मगदूम,एस.जे.मदने,बी.एस. खटके,रामदास जावीर,हणमंत खटके, शहाजी खटके यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.
यावेळी वार्षिक क्रीडा महोत्सव व शालेय विज्ञान प्रदर्शन यामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.तसेच विद्यालयाला पाच संगणक संच भेट दिल्याबद्दल राजेवाडी गावचे सुपुत्र नितीन पुजारी आणि विद्यार्थ्यांची नियमितपणे सुरक्षित वाहतूक केल्याबद्दल जयकुमार शिरकांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच आर.एल.खटके यांनी घोषित केलेल्या एन.एम.एम.एस.व शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या समृद्धी वैभव सूर्यवंशी,पियुष रामराव खटके व अनुष्का बाळू खटके या विद्यार्थ्यांसह पालकांचा रोख रक्कम व शाल,श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
माणगंगा विकास संस्थेचे सचिव व माजी उपसरपंच सुनील घोडके,डॉ.अनिल खटके, माजी सरपंच आगतराव खांडेकर,पैलवान दिलीप खटके, ग्रामपंचायत सदस्य सागर खताळ,विठलापूर येथील डॉ.हर्षवर्धन लवटे,राजेवाडी येथील वैभव हेगडे व तुकाराम शिरकांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


कु.अंजली व गायत्री यांच्या सनईचा सूर या अल्बम गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नीलम बनसोडे हिने बॉर्डर चित्रपटातील संदेशे आते है, संजीवनी व यशश्री हिने मेरा मुल्क मेरा देश हे गीत, सोनम व आदेश बनसोडे यांनी ख्वाडा चित्रपटातील गाणं वाजू द्या, वेदिका चांगण हिने पांडू चित्रपटातील केळेवाली, शाहीन शेख हिने मेड इन चायना चित्रपटातील ओढणी, चैत्राली केंगार हिने नाम तुझे हा अभंग, सृष्टी खटके व साहिल खटके यांनी इश्काची नौका हे कोळीगीत, कु.समृद्धी सूर्यवंशी हिने देशभक्तीपर गीत, पायल सरतापे हिने मला घेऊन चला चित्रपटातील तुमच्या पुढ्यात कुटते मी ही लावणी, सृष्टी मदने हिने पुष्पा चित्रपटातील सामी सामी हे गीत, सानिका, आरती व साक्षी शिरकांडे यांनी खंडेराया हे रिमिक्स अल्बम गीत, संजना, सिद्धी, माऊली व मंगेश बुधावले यांनी हिंदी कॉकटेल गीत, अल्फिया,प्रतीक्षा,साक्षी,जान्हवी ,अल्मास यांनी फना चित्रपटातील देश रंगीला हे गीत, वेदिका, श्रेया, सायली यांनी कोळीगीत, चैत्राली केंगार हिने जोगवा चित्रपटातील ललाटी भंडारा, शाहीन शेख हिने दगडी चाळ २ चित्रपटातील राघू पिंजऱ्यात आला, मोनिका ऐवळे हिने लावणीची लावण्यवती ही अल्बम लावणी, दहावीतील मुलींनी तुझ्याविना काळजात हे शेतकरी गीत, संस्कार झिंबल याने जलवा हे देशभक्तीपर गीत, सृष्टी मदने हिने सरकार तुम्ही हे अल्बम गीत, प्रणिती व प्रज्वली खटके यांनी अंजाम चित्रपटातील चने के खेत में हे गीत, मिताली व नेत्राली सरतापे यांनी गोव्याच्या किनाऱ्यावर हे कोळीगीत, अल्फिया व अल्मास मुलाणी यांनी मित्रो चित्रपटातील कमारिया हे गीत, अनन्या, संजीवनी व यशश्री यांनी देश मेरे हे देशभक्तीपर गीत, रेणुका डोंबाळे हिने डफलीवाले हे सरगम चित्रपटातील गीत आणि सायली जरग हिने चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा ही लावणी सादर केली. इयत्ता पाचवी व सहावीच्या मुला मुलींनी व्यसनाचा नाद आयुष्य बरबाद आणि इयत्ता सहावी व सातवीच्या मुला मुलींनी हुंडा नको पोरगी द्या या नाटिका सादर केल्या.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गायक व अभिनेते नरेंद्र दीक्षित मार्गदर्शन करताना म्हणाले, लिंगीवरेसारख्या लहान गावात गुणवान विद्यार्थी तयार होत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे.लिंगीवरे येथे धुळाजीराव झिंबल यांच्या नावाने लावलेले विद्यालयाचे रोपटे दिवसेंदिवस फुलत असून विद्यार्थ्यांच्या रूपाने त्याच्या फांद्या फुलत जाऊन भविष्यात ते आणखी नावलौकिक मिळवतील. या शाळेमध्ये गुणवान विद्यार्थी आहेत.संस्थेचे चेअरमन,शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक यांचं त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. आपला माणदेश हा साहित्यिकांचा माणदेश आहे.आपल्या मातीतील अनेक कलाकार दूरचित्रवाहिन्यांवर काम करताना दिसत आहेत.लवकरच या भागात सुंदर अशी वेब सिरीज सुरु करीत आहोत.कलेची आवड असणाऱ्या या विद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना संधी देण्याचा त्यामध्ये प्रयत्न करू.


विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री झिंबल प्रास्ताविकामध्ये बोलताना म्हणाल्या,शाळा हे समाज विकासाचे प्रभावी माध्यम आहे.यामधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. केवळ शासनाने ठरवून दिलेला पाठ्यक्रमच शिकवण्याने जडणघडण होत नसून त्यांच्या अंगी असणाऱ्या विविध सुप्त गुणांचा शोध घेऊन त्याच्या विकासाला चालना देणे हेही शाळेमध्ये तितकेच महत्त्वाचे असते.
शालेय जीवनातून मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचे कौशल्य शिकून आदर्श नागरिक व मानवतावादी विचाराचा पाईक निर्माण करता येणारा विद्यार्थी घडवणे हे शाळेचे कौशल्य आहे. त्यासाठी आपले विद्यालय जरी ग्रामीण भागात असले तरी येथे असे असतं कसोशीने प्रयत्न केले जातात. वर्षभरामध्ये विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा महोत्सव, विज्ञान मेळावे, विविध वैशिष्ट्यपूर्ण दिन साजरे करणे, महात्म्यांची जयंती साजरी करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, नवतंत्रज्ञान अंगिकारण्यास चालना देणे, यासारख्या कार्यक्रमांबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे उपक्रमही विद्यालयामध्ये राबवले जात आहेत.
स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला बक्षीस देता येणे शक्य नाही.परंतु बक्षीस मिळवण्यात त्यांची योग्यता निर्माण करताना आम्ही कसोशीने प्रयत्न केले आहेत. तसेच कोरोना कालावधीनंतर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या विविध गुणदर्शनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.आपल्या सर्व चिमुकल्यांच्या या कार्यक्रमाला सुज्ञ प्रेक्षकांनी मूल्याधारित दाद देऊन त्यांच्या गुणांचे कौतुक करावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.