लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

लिंगीवरे येथील धुळदेव शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री. धुळाजीराव झिंबल विद्यालयातील विद्यार्थी चि. पियुष रामराव खटके व कु.समृद्धी वैभव सूर्यवंशी यांनी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून जिल्हा गुणवत्ता यादीत निवड होऊन शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत लिंगीवरे येथील धुळदेव शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित श्री. धुळाजीराव झिंबल विद्यालयातील विद्यार्थी चि.पियुष रामराव खटके यांने 200 गुण मिळवून व कु.समृद्धी वैभव सूर्यवंशी हिने 198 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत त्यांची निवड झाली आहे.
धुळदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जनार्धन झिंबल, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री झिंबल, सर्व शिक्षक व पालकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच मार्गदर्शक शिक्षक आर.एल.खटके,एल.जी.खटके,एच.एम.वळकुंडे,एस.बी.पुजारी,एस.बी.सुर्यवंशी,एस.जे.मदने,डी.पी.मगदूम तसेच लिपिक ब्रह्मदेव खटके व सेवक वर्ग रामदास जावीर, शहाजी खटके व हणमंत खटके यांचे परिश्रमाबद्दल अभिनंदन केले.
विद्यालयामध्ये मंडळाचे अध्यक्ष जनार्धन झिंबल यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सौ.जयश्री झिंबल व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सदैव तत्पर असतो. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यालयातील विद्यार्थी सहभाग घेऊन व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करतात. यासाठी त्यांना वारंवार प्रेरित केले जाते.
समृद्धी सूर्यवंशी हिचे वक्तृत्व व बुद्धिमत्ता यामुळे ती विविध विषयांमध्ये यश संपादन करते. दोन्हीही विद्यार्थ्यांच्या उज्वल यशाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे व शाळेचा नावलौकिक वाढत आहे.