कानकात्रेवाडी येथे घरास आग लावून नुकसान केल्याची फिर्याद दाखल

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी येथील किसन माने यांच्या घराला बबन मेटकरी यांनी आग लावून बेड, कपाट, टीव्हीसह संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान केल्याची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान किसन दादू माने (वय ५७, धंदा गलाई व्यवसाय, मुळगाव कानकात्रेवाडी, सध्या रा. अर्धांगी जि. पुदुकोटा तामिळनाडू) यांना बबन शामराव मेटकरी रा. मानेवाडी याने शिवीगाळ करून कानकात्रेवाडी येथील घरास आग लावून घरातील चार बेड, फ्रिज, दोन कपाट, दोन टीव्ही तसेच संसार उपयोगी वस्तू जळून नुकसान केल्याची फिर्याद किसन माने यांनी दिली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक शरद मेमाण यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.