आटपाडी येथे उद्या हिंदू धर्म संरक्षक ठोक महामोर्चा

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथे शुक्रवार दिनांक ३० डिसेंबर रोजी ११.०० वाजता एसटी बस स्टॅन्डपासून तहसील कार्यालयापर्यंत आटपाडी तालुक्यातील विविध संघटना,युवक व नागरिकांनी तालुक्यात सध्या सुरू असलेल्या धर्मांतरणाच्या प्रश्नावरून हिंदू संरक्षक ठोक महामोर्चाचे आयोजन केले आहे.
आटपाडी तालुक्यांमध्ये सध्या धर्मांतरणाच्या प्रश्नावरून मोठा कल्लोळ निर्माण झाला आहे. यासंदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनात हा मुद्दा मांडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी व यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून आटपाडी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघटना, आटपाडी तालुका बार असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, यांच्यासह अनेक संघटना, तसेच युवक व काही नागरिकांनीही महामोर्चाचे आयोजन केले आहे.
या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात दिनांक २८ डिसेंबर रोजी कलेश्वर मंदिर येथे बैठक घेण्यात आली. त्यानुसार तालुक्यातील सर्व संघटना, युवक वर्ग व जनतेला आवाहन करून या मोर्चामध्ये सामील होऊन हिंदू धर्म संरक्षणासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.