
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील विटलापूर येथे विहिरीत पडून 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सचिन धनाजी दोडमिसे (करांडे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, विठलापूर येथील सचिन धनाजी दोडमिसे (करांडे) हा आज दोन वाजण्याच्यापूर्वी मयत अवस्थेत बंड्याच्या म्हसोबाजवळ असलेल्या सुरेश कृष्णा करांडे यांच्या विहिरीत पाण्यात पडून बुडून मयत झाला. याबाबतची खबर बापू मुरलीधर काळेल यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली असून घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस हवालदार पांढरे व पोलीस नाईक खाडे करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या