धर्मांतराच्या मुद्द्यावरून आटपाडी शहर कडकडीत बंद

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून आटपाडी बंदला दिलेल्या हाकेला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. सकाळपासून शहरातील सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवून पुकारलेला बंद यशस्वी केला.
आटपाडी तालुक्यात सध्या धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून मोठे वादळ निर्माण झाले आहे.धर्मांधरणाच्या मुद्द्यावरून काही संघटना व व्यक्तींनी विरोध दर्शवून निषेध व्यक्त केला. तसेच आज रविवारी आटपाडी शहर बंद ठेवण्याचा हाक दिली होती. त्यानुसार सकाळपासूनच संपूर्ण शहरातील एकाही व्यापाऱ्याने आपले दुकान उघडले नाही.
आटपाडी नगरपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर प्रेरणास्रोत्र म्हणण्यात आले. संघटनाच्या व्यक्तींनी व कार्यकर्त्यांनी आटपाडी शहरातून बंदला साथ देण्याबाबत आवाहन करून बंद यशस्वी केला.
मोहनभाऊ देशमुख,संजय राक्षे,सागर पाठक,ज्ञानेश्वर राक्षे,संतोष राक्षे,मनोज देशपांडे,शंभूराजे जाधव,प्रदीप क्षीरसागर,आनंद सुरवसे,कल्याणराव काळे, रमेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी व तरुणांनी बंद यशस्वी करण्यामध्ये सहभाग घेतला.
संपूर्ण बाजारपेठ बंद असल्यामुळे दवाखाने व मेडिकल स्टोअर्स वगळता कोणीही दुकानाकडे फिरकले नाही. शनिवारचा बाजार झाल्यानंतर रविवारी आटपाडी बाजारपेठेमध्ये पातळाई असते. त्यातच आज बंद पुकारल्यामुळे व पाळल्यामुळे बाजारपेठेत एकही गिराईक फिरकले नाही. पुकारलेला बंद यशस्वी करण्यामध्ये संघटनांना व व्यक्तींना यश आले.सायंकाळी कल्लेश्वर मंदिर येथे महाआरतीचे नियोजन करण्यात आले.