
सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीची स्थगिती उठवली
आज आदेश पारित
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चौकशीची स्थगिती उठवण्याबाबतचा आदेश आज पारित करण्यात आला. राज्य शासनाच्या विशेष कार्य अधिकारी व सहनिबंधक सहकारी संस्था यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकारी संस्थांचे सहकार आयुक्त व निबंधक यांना याबाबत आज पत्राद्वारे कळविले आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चौकशीला 23 सप्टेंबर 2021 च्या शासन पत्रांन्वये स्थगिती देण्यात आली होती. तथापि सद्यस्थितीत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चौकशीवरील स्थगिती उठवण्याबाबत शासनाने विशेष कार्य अधिकारी व सहनिबंधक सहकारी संस्था यांना आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने दिलेली स्थगिती उठवण्यात येत असून त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी असे राज्याचे सहकारी संस्थांचे सहकार आयुक्त व निबंधक यांना आज 30 डिसेंबर रोजी आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक