

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
करगणी येथे गर्ल्स हायस्कूलनजीक झालेल्या अपघातात आयशर टेम्पो अंगावरून गेल्याने वीस वर्षीय युवक जागीच ठार झाला. सचिन अरुण पांढरे असे मृत युवकाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, सचिन अरुण पांढरे रा.करगणी ता.आटपाडी जि. सांगली हा करगणी येथील कराड-पंढरपूर महामार्गावर करगणी गर्ल्स हायस्कूलनजीक डमडमला थटल्याने भिवघाटच्या दिशेने निघालेला आयशर टेम्पो त्याच्या अंगावरून गेला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. घटनेची नोंद आटपाडी पोलीस करीत आहेत.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या