जतच्या यल्लमादेवी यात्रेची सुरुवात,आज गंधोटगीचा दिवस

उद्या महानैवेद्य: बुधवारी किचने यात्रेची सांगता
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

जत येथील श्री यल्लमा देवीची १३ यात्रा यावर्षी मोठ्या प्रमाणात भरली आहे. मोठ्या प्रमाणात यात्रा त्रित भरल्याने दुकानदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी तीन भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नंतर लावली. या यात्रेसाठी कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या क राज्यांतून भाविकांची लाखोंच्या तर संख्येने उपस्थिती असते.
श्री यल्लमा देवीची यात्रा आठवडाभर सुरू असते. यापूर्वी यात्रेचे नियोजन तत्कालीन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात येत होते. परंतु श्रीमंत अनिलराजे डफळे यांनी यल्लमादेवी प्रतिष्ठानची स्थापना करून ही यात्रा प्रतिष्ठानच्यावतीने भरविण्यास सुरूवात केली. त्यामुळे यल्लमादेवी प्रतिष्ठान यांच्यावतीने या यात्रेचे संपूर्ण नियोजन करण्यात येते.
राज्यभर जनावरांना लम्पी या आजाराने ग्रासले आहे. परंतु पहिल्यांदाच जत यात्रेत जनावरांचा बाजार व प्रदर्शन नसल्याने पशुपालकांमध्ये नाराजी आहे. यात्रेत करमणुकीची साधने आली आहेत. तसेच यात्रेत मेवामिठाईची दुकाने, नारळ विक्रेते, हळदी-कुंकू दुकानदार, भेळपुरी, पावभाजी सेंटर, वडापाव, दाबेलीची दुकाने, हॉटेल, रसवंती गृहे, भांड्याची व सौंदर्य प्रसाधने यांचे मोठ्या प्रमाणात स्टॉल लागले आहेत. यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात भरविण्यात आली आहे.
सोमवारी यल्लमादेवी यात्रेतील गंघोटगीचा दिवस आहे.. यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे, उपाध्यक्षा श्रीमंत ज्योस्नाराजे डफळे, देवीचे पुजारी सुभाष कोळी, स्वप्नील कोळी यांनी यात्रेकरूंसाठी सर्व त्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रतिष्ठान रात्रंदिवस प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोहन माने-पाटील, अरूण उर्फ बारू शिंदे, मोहन चव्हाण, श्रीकृष्ण पाटील, पापा सनदी, अनिल शिंदे, गणपतराव कोडग, प्रा. कुमार इंगळे, चंद्रकांत कोळी, गायकवाड, संग्राम राजेशिर्के, सलिम गवंडी, आदी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.