सांगली येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकास आयकर उपायुक्त सचिन मोटे भेट

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

मुंबई आयकर उपायुक्त सचिन मोटे यांनी सांगली मधील ( विजयनगर) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक व स्मारक येथील लायब्ररीस भेट दिली. यावेळी डॉ.सचिन मोटे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपस्थित नगरसेवक विष्णू माने,पलूस उपनगराध्यक्ष नगरसेवक संदीप शिसाळ, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, सोलापूरचे अर्जुन सलगर,डाॅ. सुरेश वाघ आदि उपस्थित होते. यावेळी स्मारक समितीच्या वतीने नगरसेवक विष्णू माने, डाॅ. रामदास हजारे, इंजि. अनिल कोळेकर, अॅड सुधिर गावडे, अॅड. सिद्धेश्वर ओलेकर यांनी आलेल्या मान्यवरांच्या सत्कार केला.
यावेळी आयकर आयुक्त सचिन मोटे यांनी स्मारक व परिसराची पाहणी केली.स्पर्धा परिक्षा साठी मुंबई आयकर उपायुक्त सचिन मोठे यांनीही मार्गदर्शन केले.व येथील लायब्ररीस भेट दिली. येथील सुसज्ज भव्य स्मारक पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, तसेच ग्रंथालया समृद्ध करण्यासंदर्भात तसेच स्पर्धा परिक्षा तयारी साठीचे केंद्र निर्मीतीसाठी आवश्यक हवी ती मदत करण्याची ग्वाही दिली .
स्मारक हे येथील चळवळीच्या केंद्र बनेल.त्याचबरोबर स्मारकात विविध समाजोपयोगी उपक्रम घेत असल्याबद्दल स्मारक समितीचे अभिनंदन केला. व बुद्धीजीवी वर्ग, प्राध्यापक, डाॅक्टर, वकील, व्यवसायिक यांच्या एकीसाठी कॅडरबेस कॅम्प घेऊन सर्व घटकांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे बोलून दाखविली. विष्णू माने, अर्जुन सलगर, प्रा. कृष्णा आलदर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी गणेश माने, मधुकर हाके, सरगर आदी उपस्थित होते.