


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी येथील दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी आमिष दाखवून पळवून नेल्याची फिर्याद स्वतंत्रपणे आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे.
घटनेबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी येथील एका अल्पवयीन मुलीला १० डिसेंबर रोजी रात्री १०.०० ते ११ डिसेंबर रोजी १२.३० वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरातून कशाचे तरी आमीष दाखवून पळूवून नेले आहे. याबाबतची फिर्याद संबंधितांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.
तसेच अन्य एका मुलीस १० डिसेंबर रोजी रात्री १०.०० वाजता ते पहाटे ४.३० वाजण्याच्या दरम्यान तिच्या राहत्या घरातून कशाचे तरी आमीष दाखवून पळवून नेले आहे. याबाबतची ही फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या