


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
बेडग
बेडग येथे एका वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. बेडग येथे नरवाड रोडवरील एका विहिरीत हा मृतदेह पाण्यावरती तरंगताना शेजारील ग्रामस्थांनी पाहून मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली. मिरज ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनस्थळी धाव घेतली .सांगली येथील स्पेशल रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
रविवार दि. २७ नोव्हेंबरपासून हे ग्रहस्थ घरातून बेपत्ता होते.
सदरचा मृतदेह हा पारीसा आण्णू चौगुले वय वर्ष ५५ यांचा आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या