
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघाजणांवर गुन्हा दाखल
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना आटपाडी तालुक्यातील लिंगीवरे गावच्या हद्दीतील ठोंबरेवाडी येथे घडली.चारित्र्याचा संशय घेऊन तसेच लग्नात दागिने न दिल्याचा राग मनात धरून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ठोंबरेवाडी (लिंगीवरे) येथील चौघाजणांवर आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल कैलास धुलगुडे, दादासो कैलास धुलगुडे, कैलास कृष्णा धुलगुडे, शालन कैलास धुलगुडे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. मृत विवाहिता कोमल हिचा भाऊ ऋषिकेश दादासो जरग यांनी याबाबतची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिनांक 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ऋषिकेश जरग यांची बहीण कोमल हिला तिची सासू शालन, सासरा कैलास, दिर दादासो व पती विशाल यांनी तिच्या लग्नात दागिने दिले नाहीत, तसेच विशाल याचा भाऊ दादासो यांच्या लग्नाकरिता व जमीन खरेदी करण्याकरिता त्यांनी मागितल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत, याचा राग मनात धरून व कोमल हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण करून शिवीगाळ करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी चुलत भाऊ चैतन्य याच्या लग्नाला का गेली म्हणून या चौघांनी मारहाण केल्यामुळे त्यांच्या छळास कंटाळून कोमलने गळफास घेतला, अशा स्वरूपाची फिर्याद मृत कोमलचा भाऊ ऋषिकेश दादासो जरग रा. महाडिकवाडी,लिंगीवरे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी भेट दिली. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या