


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी पोलीस ठाण्यातील दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे परत करण्यात आला.
आटपाडी पोलीस ठाणे कडील गु. र.न. 261/22 कलम 392, 342 मधील फिर्यादी श्रीमती कोंडाबाई ज्ञानदेव कुंभार वय 90 रा.चिंचाळे यांना कोर्ट आदेशाने गुन्ह्यात चोरीतील गेलेला किंमती मुद्देमाल 49 मण्यांची माळ व कर्णफुले ही परत करण्यात आली. तसेच गु. र. न. 334/ 22 मधील फिर्यादी नितीन कालिदास खरात रा. गुरसाळे ता.पंढरपूर जि. सोलापूर यांना कोर्ट आदेशाने गुन्ह्यात जप्त १३९.५ ग्रॅम बॉक्स चैन व 75 ग्रॅम चैन असा 9,23,596 /- किमतीचा मुद्देमाल परत देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व स्टाफ यावेळी उपस्थित होता.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या