आटपाडी येथे उद्यापासून संविधान जनजागृती सप्ताह, व्याख्यानमाला

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

फुले शाहू आंबेडकर विचारमंच, आटपाडी यांच्यावतीने चलो संविधान की ओर अभियान अंतर्गत भारतीय संविधान जनजागृती सप्ताह निमित्त दि. २० नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर,२०२२ या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्पण केलेला पवित्र ग्रंथ संविधान, ‘२६ नोव्हेंबर या भारतीय संविधान दिनानिमित्त’ या संविधान जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानिक लोकशाही प्रक्रिया सर्व जनतेमध्ये रुजावीी, त्याची ओळख व्हावी व एकसंघ भारत देशाच्या निर्मितीकरिता स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजारामबापू हायस्कूल, आटपाडी येथे होणाऱ्या या कार्यक्रमास सर्व जनतेने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष तसेच रिपाईचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्रबापू खरात यांनी केले आहे. यानिमित्त आटपाडी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाटप करण्यात येणार आहे.
शनिवार दि.२६ रोजी सकाळी ९.०० वाजता तहसीलदार बाई माने यांच्या हस्ते संविधान ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार असून माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहे. फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष व रिपाईचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्रबापू खरात स्वागताध्यक्ष आहेत. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीरभाऊ गाडगीळ, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील, भवानी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रावसाहेबकाका पाटील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ओबीसी आरक्षण आणि भारतीय संविधान या विषयावर डॉ. प्रकाश कुंभार यांचे व्याख्यान होणार आहे. सेवानिवृत्त शांतिदूत सुभेदार मेजर महादेव नामदेव शेजाळ यांना जीवनगौरव पुरस्कार व सेंट्रल रेल्वे बँकेचे चीप मॅनेजर डी. एस.सावंत यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत सांगोला रेवनील ब्लड बँकेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि.२१ रोजी सायंकाळी ६.३० वाजता भारतीय संविधान समोर वर्तमान आव्हाने या विषयावर कोल्हापूर येथील प्रभाकर निर्सगंध यांचे व्याख्यान होणार असून अॅड. सुजित लाळे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आहेत.
मंगळवार दि.२२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता संविधाननिष्ठ राष्ट्रवादाचे स्वरूप या विषयावर नांदेड येथील डॉ. आनंद राऊत यांचे व्याख्यान होणार असून जतचे तहसीलदार जीवन बनसोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.
बुधवार दि.२३ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान आणि महिला या विषयावर तासगाव येथील विक्रांत पाटील यांचे व्याख्यान होणार असून प्रा.डॉ. युवराज मोटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.
गुरुवार दि.२४ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानाची मूल्य व्यवस्था आणि वर्तमान संसदीय राजकारण या विषयावर पंढरपूर येथील ज्येष्ठ अभ्यासक सुनील वाघमारे यांचे व्याख्यान होणार असून सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक शरद चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.
शुक्रवार दि.२५ नोव्हेंबर रोजी वर्तमान लोकशाही चार स्तंभाची शासन, प्रशासन, मीडिया आणि न्यायपालिका भूमिका आणि भारतीय संविधान एक गंभीर चर्चा या विषयावर अॅड. डॉ. सुरेश माने यांचे व्याख्यान होणार असून आरपीआय आठवले गटाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.
शनिवार दि.२६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता संविधान सप्ताहाचा सांगता समारोप असून भारतीय संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी हीच खरी सार्वभौम राष्ट्रवादाची निर्मिती या विषयावर आयकर उपायुक्त सचिन मोटे यांचे व्याख्यान होणार आहे. सांगली येथील शासकीय योजना माहिती व मार्गदर्शन केंद्राचे डॉ. कैलास पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. एस एस सी बोर्ड पुणेचे कक्ष अधिकारी राजेश जावीर, प्रा.डॉ.उत्तम मोटे, सहाय्यक अधिकारी चेतन जावीर, ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण मोटे, संपादक दिपक प्रक्षाळे यांची प्रमुख उपस्थिती आहे.