करगणीत दुचाकीची चोरी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

करगणी येथील किसन बयाजी सरगर यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल चोरीला गेल्याची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या दरम्यान करगणी गावात शेटफळे रस्त्याला किसन बयाजी सरगर रा.करगणी ता.आटपाडी यांची वीस हजार रुपये किंमतीची एक हिरो होंडा कंपनीची लाल रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल (क्रमांक एम एच १० डीबी ३६६४) अज्ञात चोरट्याने चोरून नेली.याबाबतची फिर्याद किसन सरगर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील पुढील तपास करीत आहेत.