

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील लिंगीवरे येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. पांडुरंग अण्णा जावीर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, लिंगीवरे ता.आटपाडी येथील पांडुरंग अण्णा जावीर (वय ५५ वर्षे) हे आज चार वाजण्याच्या दरम्यान बांधकामाला पाणी मारत असताना इलेक्ट्रिक शॉक लागला. त्यास आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात मयत अवस्थेत दाखल केले. आटपाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कवडे यांनी फोनद्वारे आटपाडी पोलिसांना घटनेबाबतची खबर दिली. घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये झाली असून पोलीस नाईक दाइंगडे पुढील तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या