विहिरीत बुडून चिंचाळेतील तरुणाचा मृत्यू

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील चिंचाळे येथे विहिरीमध्ये पाण्यात बुडून ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. बबन शहाजी चव्हाण असे मृत तरुणाचे नाव आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील चिंचाळे येथील बबन शहाजी चव्हाण वय ३५ वर्षे आज दिनांक २५ रोजी सकाळी ७.५० वाजण्याच्यापूर्वी चिंचाळे गावचे हद्दीतील गायकवाड वस्तीवरील विहिरीमध्ये पाण्यात बुडून मयत झाले. या घटनेची खबर पोलीस पाटील सचिन राजाराम मंडले यांनी फोनवरून आटपाडी पोलिसांना दिली. घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये झाली असून पोलीस नाईक दाईंगडे तपास करीत आहेत.