

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील ३५ वर्षीय तरुणाने स्वतःच्या राहत्या घरात लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गणेश पोपट केंगार असे मयत तरुणाचे नाव आहे.
आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खरसुंडी ता. आटपाडी जि. सांगली येथील गणेश पोपट केंगार हा तरुण दारूच्या आहारी गेलेला होता. आज बुधवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान खरसुंडी येथे स्वतःच्या घरामध्ये कोणीही नसताना नैराश्यातून त्याने घराच्या पत्र्याखालील लोखंडी अँगलला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याबाबतची खबर सुभाष बाबा केंगार यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या