

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ
कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी बिरोबा बनात देवस्थान ट्रस्ट बाजूच्या देणगी कार्यालयात मारुती उर्फ नाना जगन्नाथ कोळेकर या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. देणगी कार्यालयात बसला असता गावातीलच तरूणांनी संगनमत करून कार्यालयात एकटा बघून त्याला कोंडून धारदार शस्त्राने मानेवर,पाठीवर,हातावर, पोटावर,
डोक्यात सपासप वार केले. वर्मी बसल्याने मारूती उर्फ नाना जगन्नाथ कोळेकर जागीच पडले. सदर घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून कवठेमंहाकाळ पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, आरेवाडी येथील कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ (आबा) कोळेकर यांचा मुलगा मारूती उर्फ नाना जगन्नाथ कोळेकर याची काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली होती.मारूती उर्फ नाना जगन्नाथ कोळेकर हा देवस्थान समितीच्या कार्यालयात बसला होता. देवस्थान परिसरात गर्दी झाली होती.अचानक काही तरुणांनी जबरदस्तीने देणगी कार्यालयात प्रवेश केला आणि आतून दाराची कडी लावून मारूती उर्फ नाना जगन्नाथ कोळेकर याचेवर पोटावर,पाठीवर,मानेवर, डोक्यात, हातावर चाकूने सपासप वार केले. यात मारूती उर्फ नाना कोळेकर गंभीर जखमी झाल्याने़ तातडीने त्याला मिरज शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.मात्र दवाखान्यात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली असता मारेकऱ्यांची काही नावे निष्पन्न झाली. अनिल श्रीरंग कोळेकर,संजय श्रीरंग कोळेकर, यांच्यासह सर्व संशयित आरोपी फरार झाले आहेत.
या संशयित आरोपींवर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींना लवकरच अटक करू, आरोपींच्या शोधासाठी दोन पदके रवाना केली असल्याची माहिती कवठेमंहाकाळ पोलीसांनी दिली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे पुढील तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या