

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
खरसुंडी
सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी खरसुंडी येथे सामाजिक कार्यकर्ते शेखर निचळ व त्यांचे कार्यकर्ते यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे . भाविक ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनसुद्धा कोणीही दखल घेतली नसल्याने आमरण उपोषण करीत असून मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविल्याशिवाय अमरण उपोषण मागे घेणार नसल्याचे शेखर निचळ यांनी सांगितले.
सिद्धनाथाच्या विविध उत्सवानिमित्त दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी होत असते. देवदर्शनाला जात असताना भाविकांना अतिक्रमणामुळे अरुंद रस्ते झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याकडे ग्रामपंचायत व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून भाविकांतून वारंवार याविषयी तक्रार करूनही कोणीही दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
नाथनगरीत येणाऱ्या भाविकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने रस्त्यावरच थाटली असल्याने देवदर्शनाला मंदिरात सिद्धनाथाचे दर्शन घेण्यासाठी जात असताना भाविकांची मोठी गर्दी होऊन बालक, वृद्ध व महिलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे मंदिर परिसरातील सर्व अतिक्रमणे काढून मंदिर परिसर मोकळा करावा, भाविकांना सुलभतेने दर्शन मिळावे, अशी व्यवस्था करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनास विविध मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते यांनी पाठींबा दिला आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद