

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील माडग्याळ येथील शांताबाई अण्णाप्पा कोरे वय 57 व त्यांचा मुलगा सुरेश अण्णाप्पा कोरे वय 37 हे दोघे माडग्याळ येथील दगडाची वस्ती येथे आपल्या मळ्यात राहत होते. दिनांक 6/11/2022 रोजी दुपारी 12 च्या सुमारास आई शांताबाई कोरे ही शेळ्या राखण्यास घेऊन गेली असता, मुलगा सुरेश कोरे हा आईकडे गेला. त्यांचा घरातील किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याच रागाच्या भरात सुरेश याने आपल्या जन्मदात्या आईची दगडाने ठेचून आपल्याच शेतात निर्घुण हत्या केली आहे.
घटनास्थळी जत उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले व जत पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक मोहिते यांनी संशयित आरोपी सुरेश अण्णाप्पा कोरे याला ताब्यात घेतले आहे.
अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या