वरकुटे-मलवडी येथे दारुअड्ड्यावर छापा

२३हजार ९००रुपयांचा माल जप्त
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड

वरकुटे वरकुटे-मलवडी येथे दारुअड्ड्यावर छापा ता. माण येथे चव्हाणवस्ती येथील ओढ्याजवळ म्हसवड पोलीसांनी छापा टाकून ३५ लीटर हातभट्टीची तयार दारु व दारु बनवण्याचे साहित्य असे २३ हजार ९०० रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले.
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, गुरुवार दि. 03 रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वरकुटे मलवडी ता. माण जि. सातारा गावच्या हद्दीत चव्हाणवस्ती जवळील महाबळेश्वरवाडी ते वरकुटे मलवडी जाणारे ओढ्यातील बंधाऱ्याच्या खाली उत्तर बाजूस संशयित आरोपी संजय रामचंद्र मंडले, वय ३८ वर्ष राहणार वरकुटे मलवडी तालुका माण जिल्हा सातारा हा बेकायदेशीर स्वतः आर्थिक फायदा करिता काळी हातभट्टीची दारू निर्मिती करत असताना हातभट्टीची दारू पस्तीस लिटर , हातभट्टीची दारू निर्मित करण्याचे रसायन/मुरवन 1000 लिटर व लोखंडी पत्र्याचे दोन बॅरल, दोन प्लास्टिक पाईप, दोन धातूचे पाईप तसेच मोठी धातूची दोन पातेली असा एकूण 23,900 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. म्हणून संशयित आरोपी संजय रामचंद्र मंडले याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यानुसार म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक सानप करत आहेत.