निरा देवधर प्रकल्पाला येत्या अर्थसंकल्पात तरतूद करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

माळशिरस तालुक्याच्या 16 गावासाठी व फलटण खंडाळा भोर तालुक्यातील कायम दुष्काळी गावासाठी वरदान ठरलेल्या निरा देवधर प्रकल्पाच्या कामासाठी लवकरच भरून निधीची तरतूद करून हा प्रकल्प मार्गी लावणार असे अभिवचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपूर या ठिकाणी भेटलेल्या पाणी हक्क समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. गेल्या अनेक वर्ष प्रलंबित असणारा हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी भरीव निधीची गरज आहे परंतु 2019 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना या योजनेच्या कामासाठी बंद पाईपलाईन मधून पाणी देण्याचे योजनेला मंजुरी दिली होती. 2019 ला राज्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस यांची सरकार आले परंतु या सरकारने एक रुपयाची ही मदत केली नाही त्यामुळे हा प्रकल्प रखडला गेला राज्यामध्ये सत्तांतर होऊन शिंदे फडवणी सरकार सत्तेत आल्याने या प्रकल्पाच्या निधीसाठी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार राम सातपुते सातत्याने पाठपुरावा करत आहे यावेळी आम्ही या प्रकल्पासाठी निधी देण्यात यावा असे निवेदन दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यांमध्ये सर्वसामान्य जनतेचे सरकार आल्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये भरीव निधीची तरतूद करून हा प्रकल्प मार्गी लावणार असे आश्वासन त्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाला दिले या प्रकल्पासाठी विजयकुमार देशमुख यांच्याप्रमाणे मीही शिष्टाई करण्यासाठी तयार आहे असे अभिवचन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या शिष्टमंडळाला दिले. यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व निरा देवधर पाणी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आकाश सावंत अँड गणेश सीद युवा उद्योजक अमोल वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.