मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्या इसमावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड

म्हसवड पोलीसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व्यक्तिवर गुन्हा दाखल केला.
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, गुरुवार दि. ३ रोजी संध्याकाळी ७ वाजणेच्या सुमारास म्हसवड एस टी स्टॅन्डसमोर सातारा-पंढरपूर रस्त्यावर दादा गोपिनाथ दोलताडे (वय ४० रा. वाकी-वरकुटे, ता. माण) हा दारु पिऊन हिरो होंडा मोटारसायकल चालवत असल्याचे वहातूक पोलीस संतोष बागल यांना मिळून आला. त्याच्यावर कलम १८५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.