

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
दिघंची येथील बस स्टॅन्ड चौकातील पुतळ्याच्या फाउंडेशनला कारने धडक देऊन झालेल्या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवार दि. ३ रोजी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास मल्हारपेठ-पंढरपूर रोडवर दिघंची चौक येथे अमोल नामदेव कोळेकर (वय 35 वर्षे, रा. चिंचणी मंगरूळ ता. खानापूर जि. सांगली) याने हुंडाई कंपनीची आय ट्वेन्टी चार चाकी गाडी क्रमांक (एम एच १० सी एन ८०३४) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून दिघंची चौकातील पुतळ्याच्या फाउंडेशनला धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात तो स्वतः गंभीर जखमी झाला. तसेच चार चाकी गाडीचे नुकसान झाले. याबाबतची फिर्याद पोलीस हवलदार डॉलर दादासो कोळेकर यांनी दिली आहे. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या