

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज
कळंत्रेवाडी ता.कराड गावच्या हद्दीत राज्य मार्गावर ग्रामपंचायत कार्यालयासमोर रस्ता ओलांडताना दुचाकीने दिलेल्या धडकेत वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी सौ.फुलाबाई भगवान वाघमारे(वय-७५) सोमवार दिनांक ३१ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजल्याच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना उंब्रजकडून चरेगावच्या दिशेने भरधाव वेगाने चाललेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने दिलेल्या जोरदार धडकेत त्या जखमी झाल्या. त्यांच्या उजव्या पायास दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान,अज्ञात दुचाकीस्वाराबाबत अधिक माहिती उपलब्ध झाली नसून त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याची चर्चा अपघातस्थळी जमा झालेल्या नागरिकांमध्ये सुरू होती.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या