

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे हनुमान स्टील ट्रेडर्सच्या पश्चिमेस वारकऱ्यांच्या दिंडीत पाठीमागून स्विफ्ट डिझायर कार घुसल्याने झालेल्या अपघातात तीन वारकरी जखमी झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी वारकऱ्यांच्या दिंडीत कार गाडी घुसण्याचा प्रकार घडला आहे.कालच जुनोनी येथे वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून आठजण जखमी झाले होते.
घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, मोहिते वडगाव ता. कडेगाव जि.सांगली येथील वारकरी पंढरपूरकडे पायी चालत निघाले होते. आज सायंकाळच्या दरम्यान पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांना पाठीमागून धडक दिल्याने तीन वारकरी यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत.
भिमराव पांडुरंग जाधव वय ७५ वर्षे, धनाजी राजाराम मोहिते वय ४० वर्षे,शिवाजी मारुती मोहिते वय ५० वर्षे, सर्वजण रा. मोहिते वडगाव ता. कडेगाव जि. सांगली अशी जखमींची नावे आहेत.
भानुदास दशरथ थोरात वय ५२ वर्षे रा, रहाटणी ता. खटाव जि. सातारा असे स्विफ्ट चालकाचे नाव आहे.
झरे-दिघंची रस्त्यावर दिघंची गावच्या हद्दीत हनुमान स्टील ट्रेडर्स दुकानापासून पश्चिमेस 100 मीटर अंतरावर रस्त्याच्या उत्तर बाजूस रस्त्यावर हा अपघात झाला.
जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या