गरोदर अल्पवयीन मुलीची दोघांविरुद्ध तक्रार!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर ती गरोदर राहिल्यानंतर याबाबत कोणाला काही सांगितले तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याची फिर्याद एका अल्पवयीन मुलीने दिली आहे. यावरून आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीसोबत पाच ते सहा महिन्यापूर्वी दुपारी बारा वाजता महेश किशोर पवार याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, त्यामध्ये ती गरोदर राहिली. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या भावांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. तसेच पोटातील बाळाबद्दल माझे नाव घ्यायचे नाही असे म्हणून महेश पवार व जितेंद्र उर्फ जिच्या काळे या दोघांनी अल्पवयीन मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशा स्वरूपाची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. भादंविसंच्या विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाप्रमाणे संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.