
ढोलेमळ्यातील चोरीचा प्रयत्न निष्फळ
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
विभूतवाडी ता.आटपाडी येथे श्री संत बाळूमामा यात्रेनिमित्त सायंकाळी आर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी सर्व नागरिक महिला ,पुरुष, तरुण गेले असता रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान गावातील रमेश राजाराम पुकळे यांच्या घरी चोरी झाली. त्यामध्ये सहा हजार रुपये चोरट्याने लांबविले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रात्री ११ ते १२ च्या दरम्यान रमेश पुकळे यांच्या घरी चोरांनी चोरी केली. घराला दोन खोल्या आहेत.एका खोलीमध्ये सर्वजण झोपले होते. त्या खोलीला बाहेरून कडी लावली व दुसऱ्या खोलीमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील तीन ते चार पेट्या बाहेर काढल्या व त्यातील एका पेटीतील ६ हजार रुपये रक्कम चोरट्यांनी लंपास केली. तर त्यातील एक पेटी घराच्या पाठीमागे नेऊन टाकली होती.
ज्या घरामध्ये बाहेरून कडी लावली होती, त्यामध्ये रमेश पुकळे यांचे आजोबा होते.त्यांना लघुशंकेसाठी बाहेर जायचे होते. दरवाजा उघडतात तर बाहेरून कडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यानंतर घरातील सर्व मुलांना मुलींना त्यांनी जागे केले, त्यानंतर रमेश पुकळे यांच्या कन्येने त्यांच्या भावांना फोन करून याची माहिती दिली.
ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी गेलेले त्यांचे भाऊ व गावातील तरुण यांनी घराकडे धाव घेतली. घटनास्थळी आले असता हा सर्व प्रकार निदर्शनाला आला. तोपर्यंत चोरट्याने तेथून पलायन केले होते.
त्यानंतर त्या चोरट्याने ढोलेमळा येथे दादा परसू मोटे यांच्या दरवाज्याचे ग्रील तोडले. तेथे नागरिक जागे झाले, असता तिथून चोरट्याने धूम ठोकली.
यापूर्वीही एक दीड वर्षांपूर्वी झरे परिसरामध्ये १४ ते १५ चोऱ्या झाल्या होत्या.चोरीच्या काळामध्ये पिता-पुत्रावर हल्ला झाला होता. त्यामध्ये ते जखमी झाले होते.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या