आटपाडी येथे लोकनेते पै.आण्णासाहेब रणदिवे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथे आटपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती लोकनेते पै.आण्णासाहेब (तात्या) श्रावणा रणदिवे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त शालेय स्तर वक्तृत्व स्पर्धां आयोजित करण्यात आल्या.आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
आटपाडी तालुक्याचे भाग्यविधाते श्रीमंत बाबासाहेब देशमुख व लोकनेते पै.आण्णासाहेब (तात्या) श्रावणा रणदिवे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते अरुण(भाऊ) वाघमारे, रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार समिती सदस्य विलास(नाना) शिंदे, कौठुळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्रीरंग(आण्णा) कदम, वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा नेते साहेबराव चंदनशिवे, आटपाडी पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे प्रशांत चंदनशिवे, बहुजन समता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष बळीराम रणदिवे, जनसेवा संघटनेचे अध्यक्ष नवनाथ रणदिवे, पै.अजय रणदिवे,बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ, पांडुरंग झंजे,नितीन रणदिवे,आदी मान्यवर उपस्थित होते.
संयोजक दीपक रणदिवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.विकीराज रणदिवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पै.अविनाश रणदिवे यांनी आभार मानले.
या स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते चौथीच्या लहान गटामध्ये ४८ स्पर्धकांनी, इयत्ता पाचवी ते आठवीच्या मध्यम गटामध्ये ६० स्पर्धकांनी आणि इयत्ता नववी ते बारावीच्या मोठ्या गटांमध्ये ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
लहान गटासाठी नवनाथ वलेकर व गणेश कबीर यांनी, मध्यम गटासाठी गणेश ऐवळे व योगिता शिंदे यांनी आणि मोठ्या गटासाठी प्रा.संताजी देशमुख व प्रा.नागेश चंदनशिवे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
लहान गटात जिल्हा परिषद शाळा आवळाईची विद्यार्थिनी यशश्री नितीन गळवे हिने प्रथम, अकलूज येथील गाथा ज्ञानेश्वर मिले हिने द्वितीय, जिल्हा परिषद शाळा साठे नगर येथील मनस्वी मनोज तारळेकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच जिल्हा परिषद शाळा निंबवडे येथील प्रज्वल रोहिदास जावीर यास उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
मध्यम गटात आटपाडी येथील वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कूलच्या सुफिन इम्रान तांबोळी हिने प्रथम क्रमांक, मंगेवाडी येथील पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रणिती राजेंद्र पवार हिने द्वितीय, खरसुंडी येथील सिद्धनाथ हायस्कूलच्या पूजा मधुकर कोळेकर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबवडे येथील अनुष्का रोहिदास जावीर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
मोठ्या गटात खरसुंडी येथील अवंतिका किशोर पिसे हिने प्रथम, आटपाडी येथील गौरी बाळकृष्ण देशमुख हिने द्वितीय आणि शेटफळे येथील सिद्धी अशोक गायकवाड व खुजगाव-तासगाव येथील मयुरी मारुती पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण मंगळवार दि.२५ ऑक्टोबर रोजी दिघंची येथे लोकनेते पै.आण्णासाहेब (तात्या) श्रावणा रणदिवे यांच्या प्रथम स्मृतीदिनी करण्यात येणार आहे.