आपले हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी मेंढपाळांनी एकत्र यावे – संजय वाघमोडे

कुंभोज येथे यशवंत क्रांती संघटना शाखेचे उद्घाटन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कोल्हापूर

कुंभोजसह परिसरातील मेंढपाळांनी आपले हक्क व अधिकार मिळवण्यासाठी यशवंत क्रांती संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येऊन आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी सज्ज राहावे. चराईबंदी ,कुराडबंदी, वनबंदी या शेळ्या मेंढपाळांवर अन्याय करणाऱ्या जुलमी कायद्यामुळे शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी क्षेत्र शिल्लक नसल्याने परिस्थिती अतिशय बिकट होत आहे. हे जुलमी कायदे हटवायचे असतील तर मेंढपाळांनी सरकार बरोबर संघर्ष करण्यास तयार राहावे तरच आपले अस्तित्व टिकेल असे संजय वाघमोडे यांनी सांगितले
कुंभोज (ता. हातकणंगले) येथील एसटी स्टँड चौकात यशवंत क्रांती संघटना शाखेच्या नामफलकाचे अनावरण यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री हिवरखान-बिरदेव मंदिरमध्ये कार्यक्रमप्रसंगी संजय वाघमोडे बोलत होते. शाखेचे उद्घाटन धनगरी ढोल, कैताळाच्या गजरात व भंडारयाची उधळण करीत करण्यात आले.
ते पुढे म्हणाले की, यशवंत क्रांती संघटनेची स्थापना ही गोरगरीब शेळ्या मेंढपाळ पशुपालक यांच्या न्याय हक्कासाठी करण्यात आली आहे यशवंत क्रांती संघटनेने मेंढपाळ व डंगे धनगर यांच्यासाठी केलेलं काम बघूनच समाजातूनच उठाव होऊन गावोगावी मेंढपाळ हे समाज बांधवांना एकत्र करून यशवंत क्रांती संघटनेच्या शाखा काढून यशवंत क्रांती संघटना बळकट करत आहेत. संघटनेच्या माध्यमातून मेंढपाळांना , चराऊ कुरणे तसेच मेंढपाळ व शेळ्या मेंढ्यांना विमा संरक्षण मिळावे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत मेंढपाळांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्या मेंढ्यांची नुकसान भरपाई ही संघटनेमार्फत मिळवून दिली जात असल्याने मेंढपाळांच्यात संघटनेबद्दल सहानुभूती व समाधान असल्याने मेंढपाळ स्वतः समोर येऊन यशवंत क्रांती संघटनेच्या शाखा स्थापन करत आहेत गायरान अतिक्रमणे करून संपुष्टात आली तर उसाला तीन हजार रुपये दर झाल्यापासून शेतकऱ्यांनी पडिक जमीन लागवडी खाली आणल्या.वनविभागाने शेळ्या मेंढ्या यांना वन हद्दीत बंदी घातली आहे. यामुळे शेळ्या मेंढ्याची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे..याचा परिणाम म्हणजे मटण खवय्यांना चांगले मटण मिळणासे झाले आहे..जर अशीच परिस्थिती राहिली तर आपल्या लवकरच तांबड्या पांढऱ्या रस्सा मिळणं मुश्किल होईल.
करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब कोळेकर यांनी संघटनेने केलेले काम सांगून संघटना समाजाच्या हक्कासाठी नेहमीच एक पाऊल पुढे राहील असे सांगितले. यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे हे मेंढपाळ व गोरगरीब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहातात आज त्यांच्या मुळेच आज मेंढपाळ व दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांना न्याय मिळत आहे.आपल्या हक्कासाठी लढायला वाघमोडे यांनी शिकवले. धनगर समाजाच्या व मेंढपाळ यांच्या हक्कासाठी तसेच संघटनेच्या माध्यमातून आमचे अधिकार आम्हाला मिळवायचे आहेत असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आप्पाजी मेटकर म्हणाले. मेंढपाळांना संजय वाघमोडे यांच्यामुळे न्याय मिळत असून लांडग्यांनी मेंढरे किंवा शेळी मारली तर त्याची नुकसान भरपाई मिळते.हे वाघमोडे यांच्या मुळे आम्हाला समजले..नाहीतर आजपर्यंत संघटना म्हणजे निवडणुक आली कि मेळावा घेऊन कोणाला तरी पाठिंबा देण्यापुरतेच संघटनांचे अस्तित्व होते. यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून संघटना न्याय मिळवून देण्याचे काम वाघमोडे यांनी केले असे जिल्हा संघटक अनिल बनकर यांनी सांगितले.
यावेळी हातकणंगले तालुकाध्यक्ष यशवंत वाकसे, करवीर तालुकाध्यक्ष बाळासो कोळेकर, वाळवा तालुकाध्यक्ष महेश गावडे महाराज, जिल्हा संघटक अनिल बनकर , सरपंच अरुणादेवी पाटील, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी, गटनेते किरण माळी, माजी सरपंच प्रकाश पाटील, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बिरदेव तानगे, सुुुभाष देेेवमोरे, रावसाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य आप्पासो पाटील, सदानंद महापुरे, विनायक पोतदार, ॲड. अमित साजणकर, सागर सुवासे, रईस मुजावर, अरुण जमणे, प्रभाकर घोदे, डॉ सत्यजित तोरस्कर, राहुल कत्ते, शिवसेना शहरप्रमुख निवास माने आदींसह समस्त धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कुंभोज सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पोतदार यांनी एक वही समाजबांधवांसाठी उपक्रमाला चालना देण्यासाठी एक डझन वह्या दिल्या. यावेळी यशवंत क्रांती संघटना कुंभोज शाखेचे शाखा संपर्क प्रमुख प्रवीण भानुसे, अध्यक्ष सुकुमार उर्फ पप्पू गावडेे, उपाध्यक्ष खानाप्पा पुजारी, सेक्रेटरी सतीश बंडगर ,खजिनदार, संदीप भानुसे, संघटक संतोष पुुुजारी , संघटक विठ्ठल घोदे या पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देण्यात आली. यावेळी स्वागत अध्यक्ष सुकुमार ऊर्फ पप्पू गावडे यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचलन मानाप्पा पुजारी यांनी केले तर आभार सुरेश भानुसे यांनी मानले..