‘संघर्षकार’ तानाजी वाघमोडे यांचा खा.संभाजीराजे छत्रपती यांचेकडून सन्मान

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कोल्हापूर

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना शिव-शाहू फौंडेशन-शाहूवाडी मार्फत दरवर्षी Super 30 Teachers Award देऊन गौरविण्यात येते.सन २०२२ या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार वि.मं.मालाईवाडा(येळवण जुगाई),ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर या शाळेचे शिक्षक व ‘ संघर्षमय जीवन प्रवास ‘ या पुस्तकाचे लेखक श्री.तानाजी वाघमोडे-सर यांना जाहीर झाला.
श्री.वाघमोडे यांनी राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाची दखल विविध माध्यमांनी घेतली आहे.विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,जि.प.शिक्षक स्पर्धा-कथाकथान स्पर्धेत सहभाग,शिष्यवृत्ती-प्रज्ञाशोध परीक्षा केंद्रसंचालक,जिल्हास्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक,शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर,उमेद फौंडेशन-कोल्हापूर व शिव-शाहू फौंडेशन-शाहूवाडी मार्फत चालविलेल्या विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यात सहभाग घेऊन कार्य केलेले आहे.
तसेच त्यांनी आपल्या मूळगावी शित्तूर/वारुण पैकी राघूवाडा,ता.शाहूवाडी या ठिकाणी दारुबंदी,बालविवाह बंदी,भयमुक्त समाज उपक्रम,प्रौढ साक्षरता अभियान,सामाजिक आत्मनिर्भरता अभियान,सामाजिक ऐक्यता चळवळ,गरजू विद्यार्थी दत्तक-पालक योजना असे समाजोपयोगी अनेक उपक्रम राबवून समाजाला दिशादर्शक म्हणून काम केले आहे.
उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन शिव-शाहू बहुजन सेवा संघ-शित्तूर/वारुण मार्फत २०१७ साली ‘ शित्तूर/भूषण ‘ पुरस्काराने सन्मानित करणेत आले.
कोरोना काळात विद्यार्थी शैक्षणिक नुकसान न होऊ देता आॕफलाईन/आॕनलाईन अध्यापनाचे काम चालूच ठेवले.तसेच कोरोना योद्धा म्हणून समाजाभिमुख आदर्श काम केलेने मलकापूर नगरपरिषद-मलकापूर कडून सन्मानपत्र
देऊन गौरविणेत आले.
या उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्याची शिव-शाहू फौंडेशन-शाहूवाडीने दखल घेतली.गुण-गौरव कार्यक्रम मा.खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाला.या कार्यक्रमात सन्मापत्र व सन्मानचिन्ह देऊन श्री.तानाजी वाघमोडे-सर यांना मा.खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते सन्मानित करणेत आले.या कामी शिव-शाहू फौंडेशनचे अध्यक्ष मा.श्री.संजय जगताप-सर व सर्वच कार्यकारणीचे सहकार्य लाभले.