आटपाडी येथे दि.१४ रोजी ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी व आधार काठी वाटप

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथे शुक्रवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व गरजू वृद्धांना आधार काठीचे वाटप तसेच माणदेशातील गुणवंत आणि कर्तुत्वान व्यक्तींना पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
आटपाडी येथील आधार फाउंडेशन ग्रुप यांच्यामार्फत जवळे मल्टीपर्पज हॉल, बायपास रोड, आटपाडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साठ वर्षावरील जेष्ठ वृद्ध नागरिकांसाठी काठ्या वाटप, गीत-संगीत, गझल असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला असून सर्व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक व आधार फाउंडेशन ग्रुपचे पदाधिकारी यांनी केले आहे. अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सल्लागार अरविंद चांडवले यांनी याबाबतची माहिती दिली.