

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे
माडगुळे येथील महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र येथे उपवासाच्या पाककलेच्या स्पर्धा संपन्न झाल्या. त्या स्पर्धेत एकूण ३२ स्पर्धकांनी भाग घेऊन आकर्षक बक्षिसे प्राप्त केली.
आई तुळजाभवानीच्या नवरात्र उत्सवात बऱ्याच महिलांचे नऊ दिवस उपवास असतात. याचे औचित्य साधून तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या अंगी असणाऱ्या उपजत कला कौशल्यांना वाव देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
कामगार कल्याण केंद्राच्या सौ.अरुणा विभुते ,श्री भारत विभुते, सौ.पुष्पा कांबळे यांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते.या स्पर्धेत अनुक्रमे कोमल भारत गवळी, स्वाती चंद्रकांत विभुते ,शामल नंदकुमार विभुते, निकिता सौरभ विभुते, संगीता विठ्ठल गवळी, मनीषा कुंभार, रंजना वसंत विभुते, इंदुताई बबन विभुते, पूजा संदीप विभुते, सुवर्ण लिंगडे, वैशाली गोपाळकृष्ण दीक्षित, मोनिका सचिन लिंगडे यांनी बक्षीसे प्राप्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत विभुते यांनी केले. सर्व स्पर्धकांचे तसेच इतर उपस्थित असणाऱ्या महिलांचे सौ.अरुणा विभूते यांनी आभार मानले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद