संत बाळूमामा जन्मोत्सवानिमित्त गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर गोरख देशमुख यांच्यावतीने भक्तांना महाप्रसाद

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

गोरडवाडी येथे अश्विन शुद्ध संत बाळूमामा जन्मोत्सवानिमित्त बाळुमामा मंदीर फुलानी सजवले होते.तसेच लाईटींग मंदिरावर खेळवली होती.तसेच मंदिराच्या आवारात जेवन तयार करताना महिलांनी बाळुमामाची गाणी म्हणत स्वयपांक तयार केला.ओव्यांचा कार्यक्रम दिवसभर चालू होता.तसेच दिवसभर पुरणपोळी पक्वान्नाचे जेवन चालु होते. तरुण भजनी मंडळीने भजन करून फुले टाकली. संत बाळूमामा जन्मोत्सव गोरडवाडीत मोठ्या थाटात संपन्न झाला.
संत बाळूमामा जन्मोत्सवा निमित्त गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर गोरख देशमुख व अॅड. नवनाथ देशमुख यांच्या परिवारांच्या वतीने बाळुमामाचे भक्त, सेवेकरी, साधक, वारकरी संप्रदायाचे भाविक व ग्रामस्थ तसेच भक्तांना महाप्रसाद दिवसभर पोटभर जेवण देण्यात आले .
यावेळी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर गोरख देशमुख , अॅड. नवनाथ देशमुख , सरपंच विजय गोरड , शशीकांत घुले , श्रीकांत घुले , संग्राम माने , एकनाथ विरकर ,मंजुळे ,आबा वाघमोडे ,आबासाहेब सुळ , पुजारी बाळु कोळेकर , दतू गोरड , भारत सरगर , दाजी गोरड , दशरथ गोरड , राम गाढवे , नाना पिंगळे , नवनाथ सुर्यवशी , सुदाम हुलगे , भिमराव सुर्यवशी , तुकाराम गोरड , सुरेश गोरड , हनुमंत गोरड , बाजीराव गोरड , पंढरी यमगर , संजय कोळेकर , संतोष गोरड , अजिनाथ गोरड , लक्ष्मण गोरड , विष्णू हुलगे , आबा हुलगे , बाबा गुळीक सह गावातील भावीक व परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .