
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड
राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आ.जयकुमार गोरे यांच्या समर्थकांनी आंदोलना दरम्यान दहन केल्याचा निषेध करीत म्हसवड शहर राष्ट्रवादीने संबधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी म्हसवड पोलिसांकडे केली असुन याबाबतची कारवाई त्वरीत करण्याचे निवेदन म्हसवड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स.पो.नि. राजकुमार भुजबळ यांना दिले आहे.
म्हसवड शहरात रवीवार दि. २ ऑक्टोंबर रोजी कॉरिडोर संदर्भात दोन परस्पर झालेल्या आंदोलनामध्ये आ. जयकुमार गोरे यांच्या समर्थकांनी जननिषेध मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत रामराजे यांचा निषेध केला होता, त्यामुळे आक्रमक झालेल्या म्हसवड राष्ट्रवादी ने आ. गोरे च्या त्या समर्थकांचा निषेध करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हसवड पोलीसांकडे केली आहे, तर यापुढे राष्ट्रवादी ही विरोधकांना जशास तसे उत्तर देईल असा इशारा यावेळी राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे उपजिल्हा अध्यक्ष किशोर सोनवणे, जिल्हा चिटणीस दिलीप तुपे, शहर अध्यक्ष युवराज सूर्यवंशी, मार्केट कमिटी सदस्य बाळासाहेब काळे, युवा नेते पृथ्वीराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, बाळासाहेब माने, विक्रम शिंगाडे, राजू भोसले, विलास रूपनवर, बिरा गोरड, सचिन माने, आनंदा मासाळ, सिदोबा गुरव, महादेव मासाळ, रामभाऊ मासाळ, प्रितम तिवाटणे आदी प्रमुख उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद