मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान अंतर्गत माडगुळे उपकेंद्रात सर्व रोग तपासणी शिबीर संपन्न

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे

नवरात्रीच्या मुहूर्तावर पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान ,नारीचा सन्मान या धर्तीवर माडगुळे उपकेंद्रात सांगली जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्यामार्फत आज वय वर्ष १८ पूर्ण असणाऱ्या सर्व महिला, गरोदर माता, स्तनदा माता,किशोरी मुली यांची आरोग्य तपासणी शिबीर माडगुळे येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस लक्ष्मीच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सह बॅंकेचे मॅनेजर विश्वजीत देशमुख,अंगणवाडी सेविका सौ बालिका विभुते यांच्या प्रमुख उपस्थितीत व आरोग्य केंद्राच्या डॉ. जाधव , राठोड, आशा वर्कर्स सौ. संगीता कंडरे, सौ.अनिता झोडगे, सौ.सुशिला झोडगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या शिबीरात माडगुळे गावातील महिलांच्या वेगवेगळ्या तपासण्या करून त्यांना आरोग्य केंद्रात उपलब्ध असणारी औषधे व गोळ्यांचे वाटप केले‌. या शिबीरात गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन शिबीरास उत्तम प्रतिसाद दिला.