
आटपाडी पंचायत समितीमध्ये माहिती अधिकार दिन साजरा
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी पंचायत समिती सभागृहामध्ये आज २८ सप्टेंबर माहिती अधिकार दिनानिमित्त माहिती अधिकार २००५ कायदयांतर्गत आटपाडी तालुक्यातील विविध कार्यालयातील अधिकारी , पंचायत समिती मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या करीता संयुक्तरित्या माहिती अधिकारी २००५ बाबतची अंमलबजावणी व सदर माहिती कायद्या अंतर्गत कार्यालयास प्राप्त होणा-या विविध अर्जाचा शासन निर्णयानुसार निपटारा कसा करावा याबाबत सखोल व सूक्ष्म असे मार्गदर्शनपर कार्यशाळां पंचायत समिती आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख सभागृहात पार पडली.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाहिन शेख, संस्थापन अध्यक्ष बेघर निराधार संस्था, मिरज तथा प्रमुख मार्गदर्शन व अभ्यासक माहिती अधिकार २००५ हे उपस्थित होते. यावेळी विविध कार्यालयामध्ये माहिती अधिकार २००५ अंतर्गत आलेले विविध अनुभव शाहिन शेख यांनी आपल्या अनुभवातून कथन केले.
शाहिन शेख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये माहिती अधिकार कायद्याची सुरवात राजस्थान येथील देवडुंगी येथून सनदी अधिकारी श्रीमती अरुंणा रॉय यांचे मार्फत भारतात प्रथम सुरवात झाली. यामध्ये एकुण ६ प्रकरणे असून ३१ कलमे असलेचे स्पष्ठीकरण शेख यांनी केले. यावेळी त्यांनी माहिती अधिकार २००५ च्या अनुषंगाने उपस्थिंतांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणा-या अधिकारी व कर्मचारी यांना पुस्तक भेट देऊन सत्कार केला व माहिती अधिकार २००५ चे अद्यावत ज्ञान ठेवावे असे प्रतिपादन केले.
सदर माहिती अधिकार २००५ या कायद्याचा वापर तालुक्यामध्ये विविध गावामध्ये प्रभावीपणे होणे गरजचे असलेचे मत शाहिन शेख यांनी केले. यावेळी गट विकास अधिकारी मनोज भोसले, सहाय्यक गट विकास अधिकारी . सचिन भोसले, कक्ष अधिकारी फिरोज शेख, तालुका अरोग्य अधिकारी सौ. साधना पवार , गट शिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे, उप अभियंता बांधकाम देवांग, उप अभियंता पाणीपुरवठा शेंडगे, तालुका आर. टी.ई कार्यकर्ता अनिल वाघमारे, अधिक्षक सचिन फोंडे, विदयाराणी मंडले, प्रशांत चंदनशिवे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी गट विकास अधिकारी मनोज भोसले यांनी माहिती अधिकारी २००५ अंतर्गत सर्व कर्मचारी कोणताही संकोच न ठेवता कायद्यांच्या चौकटीत राहुन वेळेंत मागविणेत आलेली माहिती तात्काळं देणेची असलेचे सांगितले. तसेच माहिती अधिकारी कायद्या अंतर्गत सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी आपल्या कार्यालयाच्या माहिती मध्ये पारदर्शकपणा ठेवावा असे अवाहन केले.
या कार्यक्रमाचे आभार सचिन भोसले, सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी मानले तर सुत्रसंचालन प्रशांत चंदनशिवे यांनी केले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद