
आरतीच्या वेळी दररोज पैठणी भेट!
ग.दि.माडगूळकर चॅरिटेबल ट्रस्ट,नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने आयोजन
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे
माडगुळे येथील ग.दि.माडगूळकर नवरात्र उत्सव मंडळ या मंडळाने सालाबादप्रमाणे ५ व्या वर्षी श्री क्षेत्र तुळजापूर येथून पायी ज्योती आणून दुर्गामातेच्या मूर्तीची स्थापना केली. नऊ दिवस भरगच्च अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात विशेषतः करमणूक,व्यसनमुक्ती,समाज प्रबोधन,अंगी असणाऱ्या विविध कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात रविवार दि.२५/९/२०२२ ला श्री क्षेत्र तुळजापूरकडे पायी ज्योत आणली.दि.२६ रोजी देवीची व घटस्थापना व संध्याकाळी शिव मल्हार गोंधळ पार्टी भाळवणी यांचा विशेष कार्यक्रम झाला.दि. २७ रोजी डॉ. राजकुमार सिखरे यांचा हिपनॉटीझम हा विशेष कार्यक्रम,दि.२८ रोजी शाहीर सौ.अनिताताई खरात यांचा शाहीर कार्यक्रम, दि.२९ रोजी विलास बुवा गरवारे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, दि.३० रोजी रेकॉर्ड डान्स स्पर्धा ,दि. १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध अँकर प्रतिभा पाटील पुणे यांचा होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा – सन्मान महिलांचा हा विशेष कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
दि २ रोजी शाहीर चंद्रकांत जगताप यांचा शाहीर कार्यक्रम ,दि. ३ रोजी जादूगार गौरव पवार सांगली यांचा जादूगारी कार्यक्रम, दि. ४ रोजी शिवराज वाघ्या मुरळी पार्टी अर्थात बजरंग वाघमारे यांचा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम, दि. ५ रोजी खास महिलांसाठी विविध स्पर्धा व रविवारी दि. ९ रोजी महाप्रसादाचे आयोजन व रात्री कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुधाच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाने आयोजित केला आहे. अशा प्रकारचे मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, त्याचबरोबर रोज सकाळी व संध्याकाळी ठीक ८:३० वाजता आरतीचा कार्यक्रम व महिलांसाठी दोन तास टिपरीनृत्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सुवर्णसंधीचा सर्व पंचक्रोशीतील भक्तजणांनी व ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन ग.दि.माडगूळकर नवरात्र उत्सव मंडळ माडगूळे यांनी केले आहे.
विशेष म्हणजे रोज आरतीच्या वेळी एक लकी ड्रॉ घेतला जातो. त्यात एक पैठणी स्पर्धकाला दिली जाते.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद