सुभाष मोरे,
लोणार (जि. बुलडाणा)/प्रतिनिधी :
सध्या पिकावर पडत असलेल्या विविध रोगराईसंदर्भात शेतक-यांना मार्गदर्शनासाठी नांद्रा येथे शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेतक-यांना पिकावर पडणा-या विविध रोगांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या बंदोबस्तासाठी महागड्या व विषारी औषधाचा वापर न करता पिकांवर निंबोळी अर्क, पक्षी थांबे, टँप, ह्यांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला.निंबोळी अर्क कसा बनवा़वा याविषयी माहिती देण्यात आली.
नांद्रा शिवारात २५० हेक्टर कपाशी लागवड असून रोगराईचे प्रमाण कमी असल्याने रोपे चांगल्याप्रकारे असल्याचे दिसून आले.शेतक-यांनी यूरिया खताचाच आग्रह न धरता १९:१९:१९ हया औषधाची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांवरील पडणा-या किडीचे निरीक्षण करून त्यांचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत सल्ला देण्यात आला. तसेच सर्व शेतक-यांनी वेळेच्या आत पीकविमा काढून घेण्याबाबत सांगण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी पर्यवेक्षक जितेंद्र सानप, कृषी सहाय्यक राहुल पांडे यांच्यासह मोठया प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा